पावसाळ्यात पर्यटन करणाऱ्या नागरिकांसाठी वायव्य कर्नाटक परिवहनाने 14 जुलै ते 25 ऑगस्ट याकाळात आंबोली व गोकाक साठी पॅकेज टूर ची व्यवस्था केली आहे.
गोकाक धबधबा टूर साठी सकाळी 9 वाजता बस सुटणार असून हिडकल डॅम ला जाणार आहे. तेथून 11 वाजता निघून गोडचिन्मलकी ला बस निघेल. 1 वाजता गोडचिन्मलकी येथून निघून गोकाक धबधब्याला जाणार असून 4 वाजता बेळगावला पोचेल. या टूर चा दर 160 रुपये आहे.
आंबोली टूर ची बस सकाळी 9 वाजता बेळगावच्या सीबीटी वरून निघून नांगरतास धबधब्याला पोचेल. तेथून12 वाजता निघून आंबोली धबधब्यास पोचेल. तेथून4 वाजता निघून बेळगावला पोचेल.
या टूर चा दर 260 रुपये आहे.7760991612, 613,625 या क्रमांकांवर फोन करून टूर बुक करावी.