वकिलांत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी 12 जागांसाठी 38 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.सोमवारी सायंकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती त्यावेळे पर्यंत एकूण 38 जणांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
अध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी 4 उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी 6,जनरल सेक्रेटरीच्या एक जागेसाठी 4,जॉईंट सेक्रेटरीच्या एका जागेसाठी 6, कार्यकारिणी सदस्यांच्या सहा जागांसाठी 15 तर एक राखीव महिला प्रतिनिधीच्या जागेसाठी 3 असे एकूण 38 अर्ज दाखल झाले आहेत.
अर्ज दाखल होताच निवडणूक अधिकारी वकील आर बी मिरजकर यांनी अर्जांची छाननी केली त्यात सर्वच 38 अर्ज वैध ठरले.उद्या मंगळवारी अर्ज माघारीचा दिवस असून त्यानंतरच किती उमेदवार रिंगणात असतील हे स्पष्ट होणार आहे.
अध्यक्ष पद (एक जागा)
ए जी मूळवाडमठ
एस एस किवडसन्नवर
एम एन कुलकर्णी
दिनेश एम पाटील
उपाध्यक्ष (दोन जागा)
सुधीर चव्हाण
विठ्ठल कामते
सी टी मजगी
गजानन पाटील
सचिन शिवन्नवर
श्रीमती जे एस मंडरोळी
जनरल सेक्रेटरी (एक जागा)
गुरुसिद्धेश्वर हुलेर
जी सी कुसनुर
आर सी पाटील
सुलधाळ आर एल
जॉईंट सेक्रेटरी (सहा जागा)
देवराज बस्तवाडे
शिवपुत्रप्पा फटकळ
षडाक्षरी हिरेमठ
महावीर बी पाटील(चिकदिनकोप)
केंपन्ना यादगुडे
श्रीमती पी बी हंपन्नवर
कार्यकारिणी सदस्य (सहा जागा)
इरफान यासिन बायल
प्रहलाद गडादे
यल्लप्पा गंगाई
दीपक गस्ते
रमेश गुडोदगी
आनंद गुंडली
संजीवकुमार जयी
कमलेश मायानाचे
दीपा घोरपडे
सुवर्णा हुली
हणमंत नवी
बसवराज ओसी
प्रभाकर पवार
प्रवीण पिसे
सिद्धार्थ राजे सावंत
महिला प्रतिनिधी (एक जागा)
प्रीती देसाई
आरती नंदी
सरिता श्रेयनकर