बार असोसिएशन च्या निवडणूक प्रक्रियेत मोठ्या संख्येवर अर्ज अवैध ठरवल्याने नाराज झालेल्या वकिलांनी घातलेल्या गोंधळा नंतर रद्द झालेली निवडणूक प्रक्रिया पुन्हा नव्याने जाहीर करण्यात आली आहे.न
नवीन वेळा पत्रका नुसार 31 जुलै रोजी ही निवडणूक होणार आहे.
या निवडणूक प्रक्रियेसाठी वकील आर बी मिरजकर यांची निवडणूक अधिकारी म्हणून नवीन नियुक्ती देखील करण्यात आली आहे मागील वेळीचे निवडणूक अधिकारी एल के गुरव यांनी दिलेल्या राजीनाम्या नंतर बार असोसिएशनचे सरचिटणीस प्रवीण अगसगी यांनी मिरजकर यांची नियुक्ती केली आहे.
नवीन निवडणूक प्रक्रियेसाठी गुरुवारी नवीन मतदार यादी जाहीर करण्यात आली.शुक्रवारी 19 जुलै पासून सोमवारी 22 जुलै पर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 11 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे,सोमवारी 22 रोजी सायंकाळी 5 ते 6 अर्जांची छाननी,23 जुलै दुपारी 2 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे,सायंकाळी 4 वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे,31 जुलै रोजी सकाळी10 ते सायंकाळी 5:30 पर्यंत मतदान तर सहा नंतर मतमोजणी करणे अशी प्रक्रिया जाहीर झालो आहे.
सदर निवडणुकीत 1 अध्यक्ष,2 उपाध्यक्ष,1 जनरल सेक्रेटरी,1 जॉइंट सेक्रेटरी तर 6 सदस्य त्यातील एक महिलांना राखीव अश्या पोस्ट आहेत. उमेदवारी अर्जांची किंमत 500 रुपये असणार आहे.अध्यक्ष पदासाठी तीन हजार उपाध्यक्ष आणि जनरल सेक्रे साठी दोन हजार,जॉइंट सेक्रेटरी साठी एक हजार तर सदस्यांना 500 रुपये अनामत रक्कम ठरवण्यात आली आहे.