Thursday, December 26, 2024

/

कर्नाटकातील राजकीय नाट्य सुरूच

 belgaum

सध्या कर्नाटक राज्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. काँग्रेस आणि निजद युती सरकारला हादरे बसले आणि काँग्रेसमधील काही आमदार भाजपच्या गोटात लागल्यामुळे सरकारवर विश्वास दर्शक ठराव मांडण्याची वेळ आली, मात्र सरकारने विश्वासदर्शक साठी वारंवार टाळाटाळ सुरू केली असल्यामुळे राजकीय नाटक जोरात सुरू आहे. काल रात्री उशिरापर्यंत फक्त चर्चा झाली असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात वादावादी झाली आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरकारच्या अस्तित्वाला मुदत आहे.

मागील 17 दिवसांपासून कर्नाटकात हे राजकीय नाट्य सुरू आहे त्यावर सोमवारी परत पडदा पडला नाही. रात्री 11.45 पर्यंत फक्त चर्चा आणि चर्चा होती. आणि गदारोळातच मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात यावा अशी सूचना सदस्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे .यावरून कामकाज तहकूब झाले असले तरी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी कोणता निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

रात्री नऊपर्यंत बहुमत सिद्ध न केल्यास मीच राजीनामा देऊन निघुन जातो असा इशारा विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना दिला .त्यामुळे सोमवारी सायंकाळी विधानसभेचे कामकाज थांबले. यानंतर सभाध्यक्ष आपल्या कार्यालयात निघून गेले होते. त्यावेळी मंत्री एच डी रेवांना यांनी त्यांची भेट घेऊन विधानसभेचे कामकाज मंगळवारपर्यंत पुढे ढकलावे अशी विनंती केली. त्यावर संतप्त झालेल्या सभापती नी मुख्यमंत्र्यांनी आजच बहुमत सिद्ध करावे ,अन्यथा राजीनामा देऊन निघुन जातो असा इशारा दिला होता.
काँग्रेसचे विधिमंडळ नेते सिद्धरामय्या यांनी पक्षादेशासंबंधी मुद्दा उपस्थित केला .त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या. सरकार अल्पमतात असताना देखील मुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा न देता लोकशाहीचा अवमान करीत आहेत असा आरोप भाजप आमदारांनी केला.

भाजपने विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाले पाहिजे अशी मागणी अध्यक्षांकडे केली.
विश्वासदर्शक ठरावासाठी उशीर केला जात आहे त्यामुळे कर्नाटकात सध्या अस्थिर वातावरण आहे. यावरून राज्यपाल सहा महिने राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. त्यानंतर निवडणुका होऊ शकतात किंवा विश्वासदर्शक ठराव नंतर भाजपने आपले संख्याबळ सादर केल्यास भाजपचे सरकार ही अस्तित्वात येऊ शकते ,मात्र ते लवकरात लवकर होण्याच्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधकांनी योग्य कामकाज करणे गरजेचे आहे. मात्र फक्त चर्चा करून एकमेकांवर आरोप करून जनतेला वेठीस धरण्यात आल्यामुळे देशभरात याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.