अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीचा चाकू कोयत्याने खून केल्याची घटना पिरनवाडी येथे घडली असून या घटनेमुळे पिरनवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
पतीचे नाव भरत हंचीनमनी (३९) असे असून पत्नीचे नाव शिल्पा हंचीनमनी(३४) असे आहे.भरत आणि शिल्पा यांचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नानंतर नेहमी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून भांडणे होत होती.एकदा तर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता पण नातेवाईकांनी आणि प्रकरण सामोपचाराने मिटवून त्यांच्यात समेट घडवला होता.पण समेट घडवून आणल्यावर देखील त्यांच्यात भांडणे होतच राहिली अनैतिक संबंधाच्या संशयातून हा खून झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
घटना ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.