बेळगावहून हुबळीला 45 मिनिटात पोहोचेल अशी नवी रेल्वे सुरू करणार आहोत. त्यासाठी नवीन रेल्वे मार्ग घालण्यात येणार आहे. बेळगाव हुबळी आणि धारवाड या तीन शहरांना जोडण्याचे काम होणार असून त्यासाठी रेल्वे खाते अभ्यास करीत आहे.
या शहरांसाठी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा विचार असून अभ्यास झाल्यावर लवकरच कामे होऊ शकतील.अशी माहिती खासदार व रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिली. आज झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्ड बैठकीत ते बोलत होते.
रिंग रोड महत्वाचा आहे. याला शेतकऱ्यांच्या सहकार्याची गरज आहे. असे अंगडी यांनीआवाहन केले.हुबळी रेल्वे सुरू करताना ती थेट विमानतळापर्यंत सुरू करा. अशी मागणी करून कॅन्टोन्मेंट बोर्ड तर्फे सुरेश अंगडी यांचा सत्कार करण्यात आला.बोर्डाच्या शाळेतील एक शिक्षक निवृत्त झाल्याने दुसऱ्या शिक्षकाचे प्रमोशन, कंत्राटदाराने पार्किंग शुल्क कमी करा अशी मागणी करण्यात आली होती .पण त्यांची मुदत संपली असल्याने 31 ऑगस्ट पर्यत आहे तेच दर ठेऊन पुढे नवीन निविदा काढण्याचा निर्णय झाला.राज्य सरकार चवथा शनिवार सुट्टी देते पण बोर्ड सुट्टी देत नाही. बोर्डाला वाढीव निधी नाही तो मिळवून द्या, अशी मागणी करण्यात आली.