प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाविषयी आपले मत स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणातून व्यक्त करून सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे.
देशातील अनेक प्रश्न आपण सोडवले आहेत.
भाषावार प्रांत रचनेच्यावेळी बेळगाव आणि सीमाभागात बहुसंख्य मराठी भाषिक असून देखील कर्नाटकात डांबला गेला.बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात सामील करावा मागणीसाठी सनदशीर मार्गाने अनेक आंदोलने देखील केली आहेत.
कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री निजालिंगप्पा यांनी देखील हा प्रश्न सोडवायला पाहिजे असे मत व्यक्त केले होते.सीमाप्रश्नाच्या बाबतीत केंद्र सरकारची भूमिका पालकाची आहे.यासाठी केंद्र सरकारने सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे .
पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनावर सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर,खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर,राजाभाऊ पाटील यांच्या सह्या आहेत.