मराठी परीपत्रक देणाऱ्या ग्राम पंचायतीच्या पी डी ओना निलंबित करण्याचे आदेश बजावण्यात बाबत कन्नड प्राधिकार बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी कन्नड सक्ती बाबत घेतलेल्या भूमिकेवर महाराष्ट्र एकीकरण समिती निवेदन देणार आहे.
सोमवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी यांनाच निवेदन देण्याचे ठरवण्यात आले आहे.सीमाभागातील मराठी जनतेवर बेळगाव मधील अधिकारी वर्गाकडून सातत्याने अन्याय करण्याचे प्रकार होत आहेत. येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठीचा वापर बंद करून कानडी करणाचा घाट घातला आहे.कानडी भाषा संवर्धनाच्या नावाखाली चाललेल्या या प्रकाराविरुद्ध मराठी जनतेने आता आवाज उठवण्याची नितांत गरज आहे.
बेळगावातील येथील काही कानडी पुढाऱ्यांना खुष करण्यासाठी अधिकारी घटनेचा व न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत आहेत असा देखील म.ए.समिती म्हटलं असून मराठी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मध्यवर्ती म, ए.समितीचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी,प्रादेशिक आयुक्त यांना भेटून निवेदन देणार आहे. तेंव्हा मध्यवर्ती म.ए.समिती पदाधिकारी,सदस्य सर्व घटक म.ए.समिती पदाधिकारी,सदस्य, लोकप्रतिनिधी,आजी माजी जिल्हा पंचायत,तालुका पंचायत, ग्रामपंचायत सदस्य तसेच मराठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मध्यवर्ती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.