मार्कंडेय नदीत होत असलेले ड्रेनेज मिश्रीत पाणी आणि त्याचा फटका बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलाचा लवकरच मिळणार आहे. प्रदूषण रहित पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिकांसाठी वापरले जाणार असून यासाठी जलशुद्धीकरण बसविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पंचायत के मुख्य कार्यकारी अधिकारी के व्ही राजेंद्र यांनी दिली आहे.
नुकतीच त्याने कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी मिशन मार्कंडेय सिद्धी करण्यासाठी लवकरात लवकर निधीची तरतूद करण्यात येणार असून त्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, आर आर पाटील, तालुका पंचायत चे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी ग्रामपंचायत अध्यक्षा चंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य चेतक कांबळे, यल्लाप्पा पाटील, आदी उपस्थित होते
मार्कंडेय नदीत सह्याद्री नगर, हनुमान नगर, एपीएमसी, केएलइ येथील रासायनिक युक्त पाणी आदी भागातील ड्रेनेज मिश्रित पाणी मिसळल्याने हे पाणी पिकांसाठी धोकादायक होते. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत होता. याची दखल घेत राजेंद्रन यांनी लवकरात लवकर या नदीवर दोन जलशुद्धीकरण प्रकल्प बसवणार असून शुद्ध झालेले पाणी पुन्हा नदीत सोडण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
स्मार्ट व्हिलेज अंतर्गत या प्रकल्पांना चालना देण्यात येणार आहे. याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना होणार आहे. नदी लगत असलेल्या विहिरींचे पाणी आणि पिण्यासाठी वापरण्यात येत होते मात्र ड्रेनेज मिश्रित पाणी या नदीत मिसळत असल्याने अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. वारंवार तक्रारी निवेदने आणि आंदोलने करून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्रा चा जिल्हा पंचायत केवी राजेंद्र यांनी नदीला भेट देऊन येथे जलशुद्धीकरण प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले आहे. हे प्रकल्प बसविल्यास अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे साऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.