सध्या हळूवारपणे मराठा कॉलनी टिळकवाडी परिसरात पाणी वाढत असून बंगले घरे व फ्लॅटच्या पाठीमागील भागात हळुवारपणे पाणी वाढत आहे. त्यामुळे मराठा कॉलनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाण्यात जाण्याची भीती आहे आणि घरात पाणी साचून नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील होण्याची शक्यता आहे. पाऊस असाच जोरदार संध्याकाळपर्यंत कायम राहिल्यास ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी पाण्याचा निचरा करण्याच्या बाबतीत महानगरपालिकेने वेळीच लक्ष द्यावे लागेल.
मुंबईची तुंबई झाली अशी चर्चा करत असताना महानगरपालिकेच्या आशीर्वादाने बेळगावचे तुंबगाव झाले आहे.
जखमी मुलीस सुखरूप पोचवले
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आनंदनगर भागात रस्त्यावर पाणी तुंबले आहे. पण याकडे महानगर पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. या पाण्याच्या प्रवाहातून जाताना पडून एक शालेय विध्यार्थीनी जखमी झाली होती.
या मुलीला सुखरूप घरी पोहचवण्यात आले आहे.आनंद नगर 3 रा क्रॉस येथील
आडनाव गुरव असलेल्या त्या मुलीचा तोल जाऊन ती पडली होती व तिला जखम झाली होती.युवराज चव्हाण पाटील यांनी हीमदत केली आहे.
कुठं आहे महा पालिकेचे आपत्कालीन मदत पथक?
बेळगावं शहरात अनेक सखल भागात पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे कपिलेश्वर कॉलनी,चौगुले वाडी भागातील रहिवासी वस्तीत पाणी घुसला आहे.टिळकवाडी भागातील माजी नगरसेवक पंढरी परब यांनी चौगुलेवाडी जवळील कैवल्य नगर मणियार ले आऊट ची पहाणी केली नाला तुडुंब भरून वाहत आहे.अश्या स्थितीत महा पालिकेचे आपत्कालीन मदत पथक मात्र गायब झाले आहे.