खानापूर तालुक्याची कुलस्वामिनी अशी समजली जाणाऱ्या मलप्रभा नदीला पूर आल्यामुळे नदी तुडुंब भरून वाहत आहे.गुरुवारी सकाळी पासून खानापूर शहरातील जुन्या पुलावरून पाणी वाहत आहे हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी खानापूर शहरवासीयांची तुंबळ गर्दी होत आहे .
खानापूर तालुका हा निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो या तालुक्यातून वाहणाऱ्या मलप्रभा नदीचे पाणी सौदत्ती धरणात जाऊन मिळते मलप्रभेच उगमस्थान हे कणकुंबी येथे आहे माऊली देवीच्या मंदिराशेजारी एका छोट्याश्या झऱ्या मधून या नदीचा उगम झाला आहे हाच झरा पुढे जाऊन याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मलप्रभा संपूर्ण तालुक्याला प्रदक्षिणा घालत दरी खोऱ्यातून ,जंगलांमधून वाहत येऊन असोगामार्गे ती खानापूर येथून वाहत पुढे जाऊन सौंदत्ती येथे जाऊन मिळते .जंगलामध्ये राहणाऱ्या पशू प्राण्यांची चित्रे भागवत निसर्गाचे समतोल राखत ती वाहत आहे.खानापूर चे दिवंगत माजी आमदार प्रहलाद रेमाणी यांच्या पुण्याईने खानापूर येथे घाटावर बंधारा निर्मितीसाठी १० कोटी रुपये खर्चून मोठा पुलवजा बंधारा बांधण्यात आला आहे त्यामुळे भविष्यकाळात खानापूर शहराला पाण्याची कमतरता भासणार नाही याशिवाय एकेक बंधारा आमटे व मळवी येथे प्रत्येकी ५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे.
(Photo: खानापूर शहराजवळ मलप्रभा नदीचे तुडुंब झालेला घाट)
मळवी येथील बंधारा निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे येथील बंधाऱ्याची संरक्षक भिंत एका बाजूने थोडी वाहून गेली आहे असे तेथील स्थानिक जनतेचे म्हणणे आहे.खानापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गेले पंधरा दिवस खानापूर तालुक्यात होत असलेल्या संततधार वृष्टीमुळे या तालुक्यातील आंबोळी पूल पाण्याखाली गेला आहे.हा पूल पाण्याखाली गेल्याने या पुलावरून होणारा आंबोळी, उघवडे,निलावडे, कोकणवाडा,कबनाळी,बांदेकरवाडा,कांजळा, हरिजन केरी,दारोळी, केशी कापोली मूडगई मळव आदी गावांचा संपर्क तुटला आहे.