Sunday, January 26, 2025

/

मध्यवर्ती महामंडळ लागले कामाला

 belgaum

गणेशोत्सव पुढच्या दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ कामाला लागले आहे. आज मंडळाचे अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील यांच्या नेतृत्वाखाली हेस्कोम आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या सांगण्यात आले आहेत.

हेस्कोम चे कार्यकारी अभियंता यांना भेटून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून घेतलेले डिपॉझिट परत करण्याबाबत निवेदन देण्यात आले . उत्सव काळामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज जोडण्या देण्यासाठी घेण्यात आलेले डिपॉझिट परत करण्यास टाळाटाळ करत असल्याच्या अनेक तक्रारी शहर व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून महामंडळाकडे आले आहेत. याबाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डिपॉझिट परत मिळवण्यासाठी या कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. त्यासाठी रीतसर अर्ज करण्यात आले असून त्याची दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी आहेत .तरी याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा असे निवेदन देण्यात आले.

यावेळी काही मंडळांनी बिले थकीत ठेवल्याची तक्रार हेस्कोमने केली. बिले न भरणाऱ्याबरोबरच व्यवस्थित भरणार्‍यानाही त्रास देऊ नका अशी विनंती त्यांच्याकडे करण्यात आली. याचबरोबरीने वनविभागाच्या नूतन अधिकाऱ्यांनाही भेटून गणेशोत्सव काळात अडचणीच्या ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या काढण्याची विनंती करण्यात आली. वनाधिकारी यांनी आशा 585 झाडांची यादी तयार असून धोकादायक 15 झाडे काढले आहेत असे सांगितले असता उर्वरित झाडांच्या फांद्या काढा अशी मागणी करण्यात आली.

 belgaum

सरचिटणीस शिवराज पाटील, कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, पीआरओ विकास कलघटगी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.