खानापूर तालुक्यातील नवीन आधार कार्ड केंद्रे सुरू करा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आली आहे.शुक्रवारी खानापूर तालुका म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.
आधारकार्ड बाबत सध्या एकच केंद्र असल्याने तालुक्यातील जनतेला होणारे त्रास ससेहोलपट यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत तसेच शहरात आणखीन आधार केंद्र सुरू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.याबाबत जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी याबाबत प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
।
खानापूर तालुक्यातील 65 टक्के जनता खेडोपाड्यात जंगल भागात रहाते खानापूर शहरापासून 30 की मी पेक्षा अधिक अंतरावर राहणारी जनतेची संख्या अधिक आहे अश्यात खानापूर शहरात एक आणि तालुक्यात तीन आधार कार्ड नोंदणी केंद्रे आहेत या केंद्रावर खूप गर्दी होत आहे लांबून येणाऱ्या वृद्ध लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
खानापूर तालुक्यातील ग्राम पंचायतीत किंवा राष्ट्रीय कृत बँकेत सर्कल कार्यालयात आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू करा असे देखील निवेदनात म्हटले आहे.यावेळी खानापूर समितीचे अध्यक्ष दिगंबर पाटील कार्याध्यक्ष यशवंत बिरजे,विलास बेळगावकर,विवेक गिरी,विशाल पाटील,मुरलीधर पाटील,सयाजी देसाई,प्रकाश चव्हाण, रुकमाना झुंजवाडकर आदी उपस्थित होते.