गेले काही दिवस होत असलेल्या पावसाने कंग्राळी येथील काला कथा नाल्याचा पूल पाण्याखाली गेला आहे .कुमारस्वामी ले आउट एपीएमसी सह्याद्री नगर भागातील जमिनी काढून घेण्यात आली आज सर्व भागातून पाणी साचत असून शेतात गेलेल्या महिलांना हात धरून बाहेर काढण्याची वेळ आली आहे.
हे कुठं खानापूर तालुक्यातील जंगलात घडले नसून कंग्राळीत शेतवाडीत घडले आहे.रविवारी सायंकाळी पुलावरून पाणी वाहून जात असल्याने शेताला गेलेल्या महिलांना ग्राम पंचायत सदस्य यल्लप्पा पाटील,संदीप पाटील.मंगेश कांबळे,सूरज पाटील,प्रफुल्ल पाटोल आदींनी महिलांना गवताचे भारे घेऊन येणाऱ्यांना मानवी साखळी करून आर पार केले.
शहरापासून अवघ्या तीन किलो मीटर वर ही परिस्थिती आहे महिलांना पाण्यातून काढण्यात आले. पावसाळ्यात या पुलावरून शेताला जाताना वाहून जाण्याचा धोका जास्त आहे ग्राम पंचायत, तालुका पंचायत किंव्हा जिल्हा पंचायत पातळीवर हे काम होणारे नसून आमदार खासदारांनी लक्ष देण्याची गरज आहे.
Khangrali Cha nadi la phaila clean Kara manje Pani jast jama hoiel