ज्याप्रमाणे संपूर्ण देशात विसावा कारगिल विजय दिवस साजरा झाला त्याच पद्धतीने बेळगावच्या ज्युनियर लीडर विंगने कारगिल विजय दिवसाचे आयोजन केले होते. या निमित्ताने थाटात कार्यक्रम झाला.
भारतीय लष्कर दलातील जवानांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन पाकिस्तानचा पराभव केला याचा विजय साजरा झाला .ज्युनियर लीडर विंग बेळगावच्या कारगिल हॉलमध्ये कारगिल विजय दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
मेजर जनरल अलोक कक्कर ज्युनियर लीडर विगचे कमांडर यांनी भाषण केले. या लढाईत सहभागी झालेल्या गोरखा रायफल्स च्या सुबेदार एन के चेंचोंग, सुभेदार तुफैल अहमद ,सुभेदार राजेश कुमार, परमिंदर कुमार सिंग योगेंद्रसिंग यादव यांचा सत्कार करण्यात आला.