खानापूर तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून गेल्या चोवीस तासापासून सर्वत्र संततधार पाऊस सुरू असल्याने नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक मार्गावरील पूल पाण्याखाली गेले असल्याने तीस गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. मलप्रभा नदी पात्राने तर रौद्र रूप धारण केले असल्याने नदीकाठावरील शिवारे फूटुन आजूबाजूच्या परिसराला जलमय स्वरूप आले आहे.
नदीकाठावर शेती असलेल्या शेतकऱ्यांनी कोणताही धोका न पत्करता पावसाचा जोर कमी होईपर्यंत काठावरील शिवारात जाऊ नये असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे. दरम्यान पावसाचा जोर लक्षात घेता प्रशासनाने आज शाळांना सुट्टी जाहीर करणे आवश्यक होते. याबाबत खानापूर गटशिक्षण अधिकार्यांची संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. मात्र शिक्षण खात्याच्या आदेशाची वाट न बघता शिक्षक व विद्यार्थी धो धो पावसातही शाळेसाठी घराबाहेर पडले आहेत.
केवळ सोमवारी 29 जुलै रोजी एका दिवसांत खानापूर तालुक्यातील या गावात इतक्या पावसाची नोंद झाली आहे.बेळगाव शहर परिसर 42.20,गुंजी 67 मी मी,किणये 65.50 मी मी,मंडोळी 65.50 मी मी,आमटे 74 मी मी ,मोहिशेट 64.50,शिरोली 75.50 इतका पाऊस झाला होता सोमवारी रात्रभर संततधार सुरूच होती.
खानापूर तालुक्यासह बेळगाव शहर व परिसरात खूप पाऊस पडत आहे पण शाळा व कॉलेज यांना सुट्टी देण्यात आलो नाही पूर्वी संसर्गजन्य रोगांचा फैलाव न होण्यासाठी सर्व शाळकरी मुलांना घरीच थांबण्यास सांगण्यात येत असे मात्र अजून तरी शासनाने निर्णय घेतला नाही.