खानापूर व बेळगाव तालुक्यात वातावरण जलमय झालेले असले तरी अद्याप जिल्हा प्रशासनाने सुट्टीचा निर्णय घेतलेला नाही. जिल्हा पंचायतीचे शिक्षण स्थायी समिती सदस्य रमेश गोरल यांनी या संदर्भात पाठपुरावा केला असता जिल्हाधिकाऱ्यांनी आज बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली आहे.
सर्वत्र जोरदार पाऊस आहे खानापूर तालुक्यात नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी योग्य व्यवस्था नाही अशा परिस्थितीत सुट्टी देणे आवश्यक आहे, ही गरज निर्माण झाल्यानंतर रमेश गोरल यांनी तातडीने गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याशी बातचीत केली. संबंधित अधिकाऱ्यांनी आपण जिल्हा पंचायतीच्या सीईओ व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून ठरवू असे सांगितले
(Photo:बेळगाव तालुक्यातील मार्कन्डेय नदीने घेतलेले रूप अलतगा येथील शेतवाडीतीला आलेला पूर)
यावेळी संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधला असता सुट्टीचा निर्णय आज घेतला जाईल, त्यासाठी विशेष बैठक घेऊन उद्या आणि परवा सुट्टी दिली जाईल, असे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती रमेश गोरल यांनी बेळगावला live ला दिली आहे .पावसाचा जोर वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांवर कोणतेही संकट ओढवू नये म्हणून सुट्टी देणे गरजेचे आहे. विशेषतः खानापूर सारख्या जंगलमय आणि अतिपावसाच्या प्रदेशात सुट्टी देण्याची गरज जास्त झाली आहे.