बेळगाव के एस आर टी सी दुसऱ्या बस डेपोत एका बस बस कंडक्टरने गळफास लाऊन घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे.
आनंद हरिजन वय 53 वर्षे रा.केदनूर बेळगाव असे या दुसऱ्या बस डेपोत आत्महत्या केलेल्या बस वाचकाचे नाव आहे.मध्यरात्री त्याने गळफास लाऊन घेतलं सकाळी ही घटना उघडकीस आली.
आनंद हरिजन हे बेळगाव दुसऱ्या डेपो मध्ये बस वाहक म्हणून काम करत होते गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची बदली हुबळी येथे झाली होती हुबळीत बदली झाली असली तरी हुबळी गेल्यावर त्यांना कोणतीच ड्युटी देण्यात येत नव्हती त्यामुळे नाराज होऊन त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
रविवारी सकाळी मार्केट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली पंचनामा केला मार्केट पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.बस स्थानकात गळफास लाऊन आत्महत्या केल्याने के एस आर टी सी कर्मचाऱ्यात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.