हालगा-मच्छे बायपास परिसरातील शेतातील पाणी आजूबाजूच्या शेतात पसरून शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.अखेर शेतकऱ्यांनी महामार्ग प्राधिकरणाला कळवून जेसिबीच्या सहाय्याने बायपासमधे चरी मारुन पाणी जाण्यास मार्ग करुन घेतला.यामुळे काही प्रमाणात पाण्याचा निचरा होण्यास प्रारंभ झाला आहे.
पण अद्याप पावसाळा अजून दोन महिने आहे.पावसाचा जोर वाढला तर पुन्हा शेतात पाणी साठणार हे स्पष्ट आहे. या सगळया मुळे शेतकऱ्यांना शासनाचा ताप शेतकऱ्यांना व्याप असे म्हणायची वेळ आली आहे.
गेल्या दोन दिवसापासून सारखा पडत असलेल्या पावसाने शेतीत भरपूर पाणी झाले.त्यात जास्त झालेल्या पावसाने असलेले कालवे फूटून येळ्ळूरच्या बाजूचे संपूर्ण पाणी बळ्ळारी नाल्यात येत असता मधे बेकायदेशीर केलेला बायपास उंच केल्याने शहापूर,वडगाव,अनगोळ शिवार पाण्यात बुडला होता.
त्यामुळे पीकं वाया जाणार म्हणून शेतकऱ्यांनी महामार्ग प्राधिकरण खाते अधिकाऱ्यांना कळवल आणी त्यांनी ताबडतोब एक जेसिबी व कर्मचाऱ्यांना बायपासमधे मोठ्या चरी मारुन पाणी जाण्यास मार्ग मोकळा करुन देण्यात आला त्यामुळे शेतात साचलेले पाणी कमी होऊन पीक वाचतील अशी आशा शेतकऱ्यांना वाटते.संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.