बेळगाव बागलकोट रोडला लागून असलेल्या विमानतळाला जाणाऱ्या मार्गावर पडलेले खड्डे माजी जी प सदस्य नागेश देसाई यांच्या नेतृत्वाखालील युवकांनी श्रमदानाने मुजवले आहेत. शनिवारी हे श्रमदान करण्यात आले.
सांबरा विमानतळ गार्ड रम पासून मुतगा पर्यंत प्रचंड खड्डे पडले होते. 20 लहान तर 20 मोठ्या आकारातील खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे दुर्लक्ष केले होते.
हा भाग अपघात प्रवण म्हणून ओळखला जातो. त्यातच हे खड्डे पडल्याने अपघाताला आमंत्रणच देण्यात येत होते.
सांबरा येथील युवकांनी यात पुढाकार घेतला. अडीज पोती सिमेंट काँक्रीट घालून हे खड्डे मुजवण्यात आले आहेत.सचिन पाटील, सागर देसाई ,महेंद्र गोटे,सोनू अपपयाचे,नितीन खनगावकर आदी युवक उपस्थित होते.