गेली 60 वर्षे बेळगाव शहरासह सीमाभागात मराठीचा मराठी भाषकांची संख्या अधिक आहे बेळगावातील बहुतेक ग्राम पंचायतींचा कारभार देखील मराठीतच चालतो असे असताना मराठीत कागदपत्रे दिल्याचा ठपका ठेवत कानडी संघटनांच्या दबावाखाली येऊन पी डी ओ निलंबित करण्याचा घाट घालण्यात आला आहे.
गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांच्या अध्यक्षतेखाली कन्नड प्राधिकरण बैठक आयोजित करण्यात आली होती.कन्नड भाषेची सक्ती करा हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात कर पावती, बिले घरपट्टी नोटीस आदी मराठीतून दिली जातात याचं कानडीकरणं झालं पाहिजे त्यामुळे मराठीत परिपत्रक देणाऱ्या पी डी ओ वर कारवाई करा अशी मागणी कन्नड संघटनांनी केली असता जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी मराठीत कामकाज करणाऱ्या हिंडलगा पी डी ओ वसंत कुमारी यांना निलंबित करा अश्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शासकीय अधिकारी कार्यालयात कन्नड सक्ती करण्यात अपयशी ठरतात ते व्यवस्थित अंमलबजावणी करत नाहीत असा आरोप देखील या संघटनांनी केला जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पंचायत सी ई ओ यांना पी डी ओ यांना निलंबित करा असा आदेश दिला आहे गैर कन्नड भाषेत ग्राम पंचायत परिपत्रक छापली म्हणून कन्नड अंमलात आणली नाही असा ठपका पी डी ओ वर ठेवण्यात आला आहे.
कित्येक वर्षे आम्ही ग्राम पंचायतीच्या नोटिशी बिले आणि घरपट्टी मराठीतून देत आलोय गेली 60 वर्षे आमची हिंडलगा ग्राम पंचायत मराठीतून कामकाज करत आले आहे मराठीतून कामकाज करा असा सर्वानुमते ठरावअनेकदा केलेला आहे त्यामुळे जनतेला सोय म्हणून मराठीत परिपत्रक देत आहोत मात्र जर का आमच्या वर बळजबरी करण्यात आली तर आवाज उठवू असा इशारा हिंडलगा ग्राम पंचायतीचे सदस्य रामचंद्र कुद्रेमनीकर दिला आहे.