बेळगाव शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या गोगटे सर्कल येथील रेल्वे ओव्हरब्रिजचे काम म्हणजे थूक पॉलिसी असल्याचा अनुभव येत आहे. ब्रिजच्या कामाला तडे गेल्यामुळे नागरिकांमध्ये संताप ऐकायला मिळत असून या कामाची चौकशी होण्याची गरज होत आहे.
बेळगाव शहरात एक वैभवशाली ब्रिटिशकालीन ब्रिज होता .तो ब्रिज धोकादायक ठरत असल्यामुळे पाडणे गरजेचे होते. तो पाडल्यानंतर उभारण्यात आलेला ब्रिज किती वर्षे टिकेल ही शंका निर्माण झाली असून त्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे .लोकप्रतिनिधींनी जास्तीत जास्त कमिशन खाऊन आणि कंत्राटदारांनी थूक पॉलिसी करून हे ब्रिज बांधल्यामुळे त्याचे अस्तित्व धोक्यात आले होते.
आणि काही लोकांनी फेक व्हिडिओ प्रसारित करून ब्रिज पडत असल्याचे सांगितले तर ब्रिज सुस्थितीत असून वरील बांधकामाला तडे गेले आहेत. त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. या गैरकारभरात चौकशी होऊन कारवाई होण्याची मागणी आहे.