डॉक्टरांनी आपल्या पेशाकडे समाजसेवेच व्रत म्हणून बघावे, यापुढील काळात डॉक्टरांची जबाबदारी वाढली असून रुग्णांनीसुध्दा डॉक्टर हे ईश्वराचे दुसरे रूप असल्याचे मान्य केलं पाहिजे असे विचार राणी चनम्मा युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले.
जायंट्स मेनच्या वतीने डॉक्टर दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते द्वीपप्रज्वलित करून जायंट्सची प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रस्ताविक आणि स्वागत मदन बामणे यांनी केले.व्यासपीठावर स्पे.कमिटी सदस्य मोहन कारेकर,फेडरेशन संचालक मदन बामणे,शिवराज पाटील,अध्यक्ष सुनिल भोसले, माजी अध्यक्ष अशोक हलगेकर,सेक्रेटरी प्रदिप चव्हाण उपस्थित होते.
पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री आणि ज्यानी वैद्यकीय क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली ते डॉ. बिधान चन्द्र रॉय यांचा एक जुलै हा जन्मदिन देशभरात डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो.
जायंट्स मेनच्या वतीने दरवर्षी बेळगाव आणि परिसरातील आपल्या डॉक्टरी पेशाबरोबरच सामजिक कार्यात योगदान असलेल्या डॉक्टरांना सन्मानित करण्यात येते.यावर्षीबेळगाव आणि परिसरातील आपले व्यवसायिक काम करत असताना सामजिक बांधिलकी जोपासत, गोरगरिबांना मोफत परवडेल असे औषधोपचार देऊन मदतीचा हात पुढे करणारे डाॅ.नारायण पाटील,डाॅ.सुरेश भाटे, डाॅ.टि.जी.पाटील, डाॅ.वसंतराव पावशे,डाॅ.भुषण सुतारयांचा शाल,सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सन्मानित डॉक्टरांचे कुटुंबीय,जायंट्सचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज पाटील यांनी तर आभात उपाध्यक्ष सुनिल मुतगेकर यांनी मांडले. हा कार्यक्रम शहापूर मधील हॉटेल सयाजी मध्ये पार पडला