बेळगाव शहरात स्मार्ट सिटी तयार करत असताना सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करण्याची व्यवस्था प्रशासन करत आहे, याचाच एक भाग म्हणून बेळगावच्या बसस्थानकासमोर कचरा डेपोची व्यवस्था करण्यात आली आहे .
कचरा टाकण्यासाठी नागरिकांना जास्त दूर जावे लागू नये अशीच व्यवस्था आहे. बेळगाव शहराच्या बसस्थानकासमोर साचलेला कचरा बघून प्रशासनाने याची व्यवस्था केली आहे का ?अशी शंका येत आहे .
या कचऱ्याची उचल कधीच केली जात नाही यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना बसस्थानकासमोर कचरा डेपो असल्याचा अनुभव येत आहे . बेळगाव शहरात प्रवासाच्या निमित्ताने अनेक प्रवासी येत असतात . त्यांना बसस्थानकासमोर असे कचऱ्याचे साम्राज्य दिसल्यास शहरा बद्दल काय वाटेल ? याचा विचार कचरा उचल करणाऱ्यांनी केला नाही. बेळगावचे महानगरपालिका आयुक्त ठिकाणी पाहणी करतात मात्र त्यांना ही जागा दिसली नाही का ?अशी शंका निर्माण होत आहे. शहराच्या प्रमुख केंद्र असलेल्या ठिकाणीच कचरा डेपो स्थापन करून चांगली सोय केली अशी चर्चा आहे.
हा भाग कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारीत येतो म्हणून महानगरपालिका दुर्लक्ष करते तर महानगरपालिका कचरा उचलेल म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य दुर्लक्ष करतात त्यामुळे कचरा साठत आहे वारंवार तक्रारी केल्या तरी त्याकडे कोणी लक्ष देत नाही तेव्हा आता कोण लक्ष देणार हा प्रश्नच आहे.