मध्यान्ह आहार योजनेच्या जेवणात पाल पडून अन्नात विष बाधा झाल्याने पन्नासहून अधिक शाळकरी मुले अत्यवस्थ झाल्याची घटना बेळगाव शहरात घडली आहे.अत्यवस्थ झालेल्या मुलांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व विद्यार्थी धोक्याबाहेर आहेत.
याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार वंटमुरी येथील सरकारी शाळेत ही घटना घडली असून स्थानिक आरोग्य केंद्रात या सर्व मुलांवर उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या शाळेतील जेवणाच्या भांड्यात मरलेली पाल आढळली होती त्या अगोदर 100 हुन अधिक मुलांनी जेवणाचे सेवन केले होते लागलीच त्यांच्या वर उपचार करण्यात आले. यावेळी 30 हुन अधिक विध्यार्थ्यांना उलटीचा त्रास सुरू झाला त्यावेळी पालकांनी शिक्षण खात्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि डी डी पी आय यांनी देखील गट शिक्षणाधिकाऱ्या विरोधात नाराजी व्यक्त करत जिल्हा रुग्णालयाला भेट दिली आहे.ए सी पी भालचंद्र यांनी अत्यवस्थ झालेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
अन्न पुरवठा करणाऱ्या एन जी ओ वर नोटीस पाठवून कारवाई करा असा आदेश जिल्हा पंचायत स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल यांनी शिक्षण खात्याला दिले आहेत.तहसीलदार मंजुळा नाईक व बी ई ओ यांच्या सह अत्यवस्थ विद्यार्थ्यांच्या तब्येतीची विचारपूस त्यांनी केली व योग्य उपचार करण्याच्या सूचना देखील दिल्या.