शहरात 21 मार्गावर नो पार्किंग आहे असे सांगून बेळगावच्या पोलीस आयुक्तांनी या शहरातील पहिले पार्किंग फ्री शहर करण्याचा बहुमान मिळवला आहे. कुठे पार्किंग करू नये हे सांगताना कुठेच पार्किंग करू नये असेही सांगून पोलीस आयुक्तांनी पार्किंग करावे तर कुठे हा प्रश्न शहर वासीयांसमोर उभा केला आहे. पार्किंग करू तर कुठे असेच आता नागरिक विचारत असून सोशल मीडियावर पोलीस आयुक्तांचे वेगळ्या भाषेत अभिनंदन सुरू आहे.
रहदारी सुरळीत चालावी यासाठी बेळगाव पोलीस आयुक्तांनी 21 मार्गांवर नो पार्किंग चा आदेश काढला आहे.या मार्गांवर पार्किंग केल्यास 1000 रुपये दंड आणि वाहन उचलून नेण्याचे शुल्क असा दंड भरावा लागेल. असेही कळविले. तसेच या मार्गांवर करू नका पार्किंग अशीही सूचना केली .
1) राणी चनाम्मा सर्कल ते कृष्णदेवराय सर्कल आंबेडकर गार्डन सिव्हिल हॉस्पिटल रोड
2) कोल्हापूर सर्कल ते के एल ई हॉस्पिटल
3)कोल्हापूर सर्कल ते आरटीओ सर्कल
4) चनाम्मा सर्कल ते आरटीओ सर्कल
5) अशोक चौक किल्ला ते आरटीओ सर्कल
6) किल्ला ते कनकदास सर्कल किल्ला तलाव रोड
7) न्यू गांधीनगर सर्कल ते किल्ला
8)मुजावर खुट ते सर्किट हाऊस
9) सीबीटी ते जुना पी बी रोड
10)धर्मनाथ भवन ते पोलीस भवन
11) रामदेव हॉटेल ते धर्मनाथ भवन
12) चनाम्मा सर्कल ते पवन हॉटेल कॉलेज रोड
13)कॉलेज रोड ते यंदे खुट
14) कॉलेज रोड ते धर्मवीर संभाजी चौक
15) क्लब रोड मिलन हॉटेल ते हर्षा
16) समादेवी गल्ली गोंधळी गल्ली क्रॉस ते यंदे खुट
17)किर्लोस्कर रोड ते धर्मवीर संभाजी चौक
18) एस पी एम रोड ते प्रकाश थिएटर
19)एस पी एम रोड ते शिवाजी गार्डन
20)खानापूर रोड ते आरपीडी सर्कल
21)नार्वेकर गल्ली समदेवी मंदिर ते रिसालदार गल्ली
रिसालदार गल्लीत शनिवार खुट पर्यत टू व्हीलर लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. हे सर्व मार्ग जर पार्किंग साठी बंद राहिले तर पार्किंग साठी पर्यायी जागा तरी कुठे आहे हे पोलीस आयुक्तांनी सांगणे गरजेचे होते पण ते त्यांनी न सांगितल्याने आता नागरिक अडचणीत आले आहेत.