हलगा-मच्छे बायपासमधे बेकायदेशीर पणे भूसंपादन केलेली पिकाऊ जमीन छोट्या शेतकऱ्यांची आहे ती परत करुन तो रस्ताच रद्द करावा अशी मागणी नव निर्वाचित मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांच्या कडे करणार अशी माहिती राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष कोळीहट्टी चंद्रशेखर यांनी दिली.
सोमवारी सकाळी हलगा मच्छे बायपास मध्ये शासनाने केलेली शेकडो एकर सुपीक जमीन संपादन आणि या रस्त्याच्या कामांमुळे शेतीत घुसलेल्या पाण्याची पहाणी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या नेत्यानी केली आहे. हलगा मच्छे बायपास सुपीक जमीन संपादन पहाणी केली पत्रकार परिषदेत ते बोलत होते.शेतकऱ्यांना इतर भेडसावणारे प्रश्न घेऊन मी लवकरच खूद्द मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे असे ते म्हणाले.
मागील कुमारस्वामी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याने अल्पकाळात त्यांचे पतन झाले.पण आताचे मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले येडीयुराप्पानीं गळ्यात हिरवे टॉवेल घालून शपथग्रहण केले.या सरकारने गेल्या सरकारने केलेल्या चूका सूधारुन राज्यातील शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करावेत.त्यात शेतकऱ्यांची थकलेली उसबीले,कोलमडलेली बिमा फसल योजना,पूरपरिस्थिती या समस्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी करू असे म्हणाले.
चंद्रशेखर यांनी आपल्या कार्यकर्त्यासह प्रत्यक्ष येळ्ळूर रस्त्यावर हालगा-मच्छे बायपास काम सूरु आहे त्याची पाहणी करुन तरारुन आलेले भातपीक पाहून अशा सुपीक जमीनीतून रस्ता करुन सरकारचे राज्यातील पीकाऊ जमीनच नष्ट करण्याचे उद्दिष्ट दिसत आहे.यावर मी मुख्यमंत्र्यांशी नक्कीच बोलून याभागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली.आपल्यासमवेत पूरक कागदपत्रं मागवून घेऊन ते रवाना झाले.