समस्त महाराष्ट्र सरकार सीमा बांधवांच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः बेळगावात येऊन कार्यक्रम घेणार असल्याचे ठोस आश्वासन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
सोमवारी दुपारी मुंबई मुककामी सह्याद्री अतिथी गृहावर समितीच्या शिष्टमंडळाच्या सोबत बैठक घेतली त्यावेळी त्यांनी वरील आश्वासन दिलं आहे.समिती नेते किरण ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 75 जणांचे शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले होते सकाळी त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती दुपारी ते मुख्यमंत्र्यांना भेटले.
मराठी गळचेपी कन्नड सक्ती कल्पना दिली.संपूर्ण महाराष्ट्र सीमाबांधवांच्या पाठिशी आहे हे दाखवण्यासाठी बेळगावात एक कार्यक्रम घेणार आहे त्या निमित्ताने बेळगावला येणार आहे.या शिवाय सीमा भागातील मराठी भाषिक शिक्षण संस्था वाचनालये त्यांना प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत म्हणून बजेट मध्ये तरतूद केली आहे.मराठी संस्था टिकविण्यासाठी शासन मदत करेल मराठी संस्कृती टिकवण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाठीशी असेल असेही ते म्हणाले.
दादा विरोधात तक्रार
सीमा प्रश्नी समनव्यक मंत्री नियुक्त झाल्या पासून चंद्रकांत दादा पाटील एकदाही बेळगावला आले नाहींतअशी तक्रार मुख्यमंत्र्या कडे करण्यात आली यावेळी बेळगावसाठी आणखी दोन समनव्यक मंत्री नियुक्त करू जे मंत्री बेळगावात येऊन सीमा बांधवांच्या व्यथा जाणून घेतील असे देखील आश्वासन त्यांनी दिले.माजी आमदार दिगम्बर पाटील, टी के पाटील नेताजी जाधव विलास बेळगावकर मुरलीधर पाटील,यशवंत बिरजे,सरिता पाटील रेणूं किल्लेकर,मोहन बेळगुंदकर आदीजण समितीच्या शिष्टमंडळात होते.