बेळगावच्या अबकारी खात्याने शहरातील कित्तुर राणी चन्नम्मा चौकात धाड टाकत 75 बॉक्स गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.गोव्याहून महाराष्ट्राकडे बेकायदेशीर रित्या गुड्स टेम्पो मध्ये भरून नेत असताना अबकारी खात्याच्या अधिकारी धाड टाकून गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.
अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार mh13 an 8312 या क्रमांकाच्या टाटा पिक अप गुड्स रिक्षातून बेकायदेशीर रित्या उस्मानाबाद कडे घेऊन जाणारी वेगवेगळ्या ब्रँडची 75 बॉक्स दारू जप्त करत बसप्पा कोळी आणि रमेश कांबळे या दोघां युवकांना अटक केली आहे.जप्त केलेली दारू दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले.
अबकारी खात्याचे जॉइन्ट कमिशनर मंजुनाथ,डी सी अरूणकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी डी एस पी विजयकुमार हिरेमठ आदींनी ही कारवाई केली आहे.