उंची लहान, कानाने ऐकू येत नाही आणि बोलायला येत नाही अशा अवस्थेत जन्माला येऊन संपूर्ण आयुष्य जवळ जवळ 40 वर्षे सिव्हिल हॉस्पिटल च्या आयडी वॉर्ड मध्ये घालवलेल्या पुट्टी चे निधन झाले.
सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज तिच्यावर सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी निसार समशेर, शंकर कोलकार, मल्लप्पा गुडपणावर ,संजय कांबळे, दीपक बसरीकट्टी ,अरविंद कडुकर, हे उपस्थित होते.तट्टे इडलीचे मालक शांतकुमार आणि महानगरपालिकेचे अधिकारी दिक्षित यांनी सहकार्य केले.
सिव्हिल हॉस्पिटल पोलीस आऊट पोस्टचे देवरेड्डी यांनी पुढाकार घेऊन पुट्टी वर अंत्यसंस्कार करण्यास मदत केली.