Monday, November 25, 2024

/

शॉक लागून अकरा वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत

 belgaum

लहान मुलातून क्रिकेट खेळतेवेळी चेंडू आणायला गेला असताना विद्युत खांबाला असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने
काकती येथील एक मुलगा शॉक लागून ठार झाला आहे. सिद्धार्थ शिंदे ( वय 11) असे त्याचे नाव आहे.

काकती येथील देसाई गल्ली भागात एक खांबाला विद्युत भारित तार गुंडाळून ठेवण्यात आली होती त्याला स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे या घटनेने काकती गावात एकच खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. सिद्धार्थ हा मित्रां सोबत देसाई गल्लीत क्रिकेट खेळत होता त्यावेळी चेंडू आणायला गेला असता खांबाला विद्युत भारित तार गुंडाळून ठेवली होती त्याचा स्पर्श तारेला स्पर्श होऊन जोरदार झटका लागल्याने गंभीर जखमी झाला.

त्याला लागलीच उपचारा साठी के एल ई दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपयोग झाला नाही त्याला मृत घोषित करण्यात आले.या घटनेची नोंद काकती पोलिसांत झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.