Thursday, December 19, 2024

/

अमली पदार्थ विकणाऱ्या आठ जणांना अटक

 belgaum

बेळगाव शहरांमध्ये अमली पदार्थ विकणाऱ्या आठ जणांच्या रॅकेटला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे. ए सी पी एन व्ही बरमनी यांच्या नेतृत्वाखाली माळमारुती चे पोलीस निरीक्षक बि आर गड्डेकर यांनी कारवाई केली आहे.

अखिल अहमद मुनवल्ली हा ट्रक ड्रायवर मध्य प्रदेश व महाराष्ट्र येथून अमली पदार्थांचा साठा बेळगावला घेऊन येत होता. अतिफ चाचडी आणि सलमान फतेह खान हे त्याचे साथीदार होते . सुरज असगर आणि अमीर बेग हे सुद्धा अ रॅकेट मध्ये होते.

पदार्थांचा साठा अभियांत्रिकी आणि वैद्यकीय कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विक्री करत होते. त्यांच्याकडून 650 ग्राम गांजा 4 मोबाईल तर 2 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून खरेदी करणारा अनिकेश मधुमत यालाही अटक करण्यात आले आहे .

समीर देसाई आणि रामचंद्र पवार यांना किल्ला परिसरामध्ये तो गांजा विकत असताना पोलिसांनी पकडले आहे. यांच्याबरोबरीने 126 ग्राम पन्नी सुद्धा जप्त करण्यात आली आहे.

बेळगाव शहर पोलीस आयुक्त बी एस लोकेश कुमार डीसीपी सीमा लाटकर यशोदा वंटगुडी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट एसीपी एन व्ही भरमनी माळमारुती पोलीस निरीक्षक बी आर गडेकर आदी सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.