बेळगाव महापालिकेची पुन्हा पोलखोल झाली असून भांदूर गल्लीत अनेक घरातून सांडपाणी शिरले आहे.पहिल्याच पावसाच्या दणक्यात भांदुर गल्ली रेल्वे फाटकतील अनेक घरातून सांडपाणी घुसले होते तीच अवस्था पुन्हा रविवारी झाली असून ड्रीनेजचे पाणी रेल्वे फाटका जवळील अनेक घरा घरातून घुसलं आहे.
सकाळी महाद्वार रोड तिसऱ्या क्रॉस मधील घरात सांडपाणी घुसल्याची बातमी आली असताना पुन्हा एकदा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भांदुर गल्लीत देखील तीच अवस्था झाली असून स्मार्ट बेळगाव म्हणवून घेणाऱ्या महा पालिकेची पोलखोल झाली आहे.
(Photo भांदुर गल्लीत घरा घरात घुसलेले ड्रिनेजचे पाणी)
गेले दोन दिवस शहरात संततधार सुरू आहे पावसाचे पाणी गटारीत तुंबल्याने पाणी घरात घुसले आहे अनेकदा या भागातील लोकांनी महा पालिका यंत्रणेस कळवून देखील याकडे दुर्लक्ष झाले आहे.या रेल्वे फाटका जवळील सांड पाणी रेल्वे ट्रॅकच्या खालून कपिलेश्वर कॉलनीत जाते ती पाईप बंद झाल्याने सांडपाणी वापस येत असून ते घरा घरात घुसतं आहे.
(Photo भांदुर गल्लीत घरा घरात घुसलेले ड्रिनेजचे पाणी)
नाथाजी मुतगेकर, वैभव चौगुले,गणेश चौगुले, हावळ,देसुरकर यांच्या घरातून स्वयंपाक घरा पर्यंत सांडपाणी शिरले आहे गल्लीतील सामाजिक कार्यकर्ते युवकांनी सदर सांडपाणी काढण्यास मदत केली आहे.सायंकाळी उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी पाहणी केली आणि रेल्वे अधिकाऱ्यांना महा पालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या. कोणत्याही शहराचा दर्जा त्याला मिळणाऱ्या मूलभूत सुविधे वरून ठरत असतो त्यातच बेळगाव शहर देशात स्वच्छतेत 240 व्या क्रमांक तर स्मार्ट सिटीत 40 व्या रँकिंग वर फेकले गेले आहे जर का घरा घरात ड्रिनेजचे पाणी जात असेल तर हे शहर स्मार्ट होणार की याला वाटाण्याच्या अक्षता मिळणार हेच पहावे लागणार आहे.
आमदारांनी जरी पहाणी केली असली तरी पुन्हा एकदा बेळगाव महापालिका लोकांवर चा विश्वास उडाला असून ‘बेळगावकरा तुला कार्पोरेशन वर भरोसा न्हाय काय?म्हणायची वेळ आली आहे. त्यामुळे शहर स्मार्ट कधी होणार की फक्त घोषणाच होणार अशीही टीका केली जात आहे.