बेळगाव शहरामध्ये भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. रात्रीच्या वेळी शहराच्या रस्त्यांवरून फिरणे अवघड झाले आहे .भटक्या कुत्र्यांचा धोका नागरिकांना निर्माण झाला आहे रात्रीच्या वेळी रस्त्याने चालत किंवा मोटरसायकलवरून जाणाऱ्यांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून बचाव करून घेत प्रवास करावा लागत आहे .
अनेक चौकाचौकात आणि रस्त्याच्या मधोमध भटक्या कुत्र्यांची टोळकी थांबत असून ते ये जा करणाऱ्या नागरिकांवर हल्ला करत आहेत. यामुळे या हल्ल्यात मार्ग काढत पुढे जाण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.
मांगुर या चिकोडी तालुक्यातील गावात भटक्या कुत्र्यांनी पाच शेळ्यांचा फडशा पाडला आहे त्यामुळे एका कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे तर इतर अनेक भागात या अशा घटना घडत आहेत . बेळगावमध्येही अनेकदा भटक्या कुत्र्यांनी जीव घेतल्याच्या घटना झाल्या आहेत. भटक्या कुत्र्याने पाठलाग केल्यानंतर पावसाने निसरड्या झालेल्या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेने लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
काही संस्थांनी पुढाकार घेऊन भटक्या कुत्र्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला . पण महानगरपालिकेने यासाठी जागा उपलब्ध केली नाही .त्यामुळे महानगरपालिकेने स्वतः काम करावे किंवा इतरांना तरी करू द्यावे अशी मागणी आहे.