माणूस चोरी करण्याकडे का वळतो हा विषय गरीब पासून सुरु होतो. पोटाला अन्न नाही म्हणून जगायला पैसे नाहीत म्हणून अनेक जण चोरी करतात. मात्र चोरी हा गुन्हाच आहे.
बेळगाव शहरात सोने चांदिचे दागिने व पैशांच्या चोरी बरोबरच मांजर आणि डॉबरमॅन कुत्रे सुद्धा चोरले जाऊ लागलेत. काही तरुणांनी एका पेट शॉप मध्ये जाऊन मालक व कामगारांना मारहाण करून मांजराचे पिल्लू आणि डॉबरमॅन कुत्र्याचे पिल्लू चोरून नेले आहे .
शहरातील सेकंड गेट जवळ पराठा कॉर्नर परिसरात सौरभ कोटूळकर यांच्या मालकीचे पेट शॉप आहे. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली आहे.
कुत्र्याचे पिल्लू खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणांनी खरेदी करण्याचा बहाण्याने येऊन वाद केला. घरी दाखवून आणतो असे सांगून हा वाद केला आणि ही घटना घडली आहे.
चोरी हा गुन्हाच आहे या प्रकाराकडे कोणी वळू नये मात्र आता लोक कुत्र्याची पिल्ले आणि मांजराची पिल्ले चोरू लागल्यामुळे ही चोरी गरिबीतून नसून दादागिरी तून झाल्याचे निष्पन्न होत आहे.