श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी करा अशी मागणी टिपू सुलतान संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे शुक्रवारी दुपारी टिपू सुलतान संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देत सदर मागणी केली आहे.
गुरुवारी सकाळी प्रमोद मुतालिक यांनी पत्रकार परिषद घेऊन वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप टिपू सुलतान संघर्ष समितीने केला आहे. मुतालिक यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन शिव पार याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा अशी मागणी केली होती आणि 8 जुलै रोजी संपूर्ण हिंदू बांधवांच्या वतीने या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव करत निषेध मोर्चाचे आयोजनाची घोषणा केली होती .
मुतालिक यांच्या या पत्रकार परिषदेनंतर काही तासातच टिपू सुलतान संघर्ष समितीने प्रतिक्रिया देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे आणि मुतालिक यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदीची मागणी केली आहे.
मुतालिक यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यामुळे बेळगावातील सामाजिक शांतता बिघडू शकते त्यांच्या ऍक्टिव्हिटीज वर लगाम घाला अशी देखणी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे मुतालिक यांच्यावर अनेक गुन्हे आहेत त्यांनी अनेकदा शांतता भंग केली आहे असा आरोप करत त्यांच्या वर बेळगाव जिल्हा प्रवेश बंदी करावी अशी मागणी करण्यात आली आहे