एकीकडे भाजपने कर्नाटक विधानसभेत बहुमत परीक्षण पास केल्यानंतर दुसरीकडे काँग्रेसने पोट निवडणुकांची तयारी चालवली आहे कालच बेळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मध्यावधी निवडणुकीला तयार रहा असा संदेश कार्यकर्त्यांना दिला होता त्यानंतर आज बंगळूर येथे काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झालीआहे.
सतरा अपात्र उमेदवारांच्या जागी कोण कोणते उमेदवार असावेत याबाबत चाचपणी केली असल्याची माहिती देखील मिळत आहे.सतरा अपात्र आमदारांत बेळगाव जिल्ह्यातील तीन आमदार अपात्र ठरले आहेत कागवाडचे आमदार श्रीमंत गौडा पाटील अथणी चे आमदार महेश कुमठहळळी तर गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांचा समावेश आहे.
काँग्रेसने कागवाड मधून भाजपचे माजी आमदार राजू कागे यांना श्रीमंत गौडा पाटील यांच्याविरोधात उभे करण्याची तयारी चालवली आहे याबाबत कागे यांना अद्याप अधिकृत प्रस्ताव देण्यात आला नसला तरी लवकरच काँग्रेसकडून भाजपाच्या माजी आमदारांना प्रस्ताव जाण्याची शक्यता आहे. त्यांना कागवाड मधून श्रीमंतगौडा पाटलांच्या विरोधात काँग्रेसकडून उमेदवारीची ऑफर देणार आहेत. कागे यांनी तीन वेळा श्रीमंत गौडा पाटलांचा भाजपमध्ये असतेवेळी पराभव केला होता दोघे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत त्याचा फायदा काँग्रेसने घेण्याचा प्लॅन बनवला आहे.
कागवाड मधून कागे यांनी काँग्रेसचा प्रस्ताव धुडकावला तर माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांना देखील काँग्रेस कागवाड मधून श्रीमंत गौडा पाटलांच्या विरोधात उभा करू शकते मात्र सध्या प्रकाश हुक्केरी हे पर्याय म्हणून उपलब्ध आहेत.अथणी येथील काँग्रेसचे कार्यकर्ते गजानन मंगसुळी यांना देखील काँग्रेस उमेदवार म्हणून पुढे करण्याची शक्यता आहे.
जारकीहोळी फॅमिलीतले चौथे सदस्य लखन जारकीहोळी हे कित्येक दिवसापासून राजकारणात एन्ट्री करण्यासाठी वाट पाहत आहेत गोकाक विधानसभा मतदारसंघातून रमेश जारकीहोळी यांचे लहान बंधू लखन यांना काँग्रेसचे उमेदवार म्हणून जवळपास उमेदवारी निश्चित झाली आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत गोकाक विधानसभा मतदारसंघात लखन यांनी आपल्या कामाला देखील सुरुवात केलेली आहे त्यामुळे गोकात मतदारसंघात दोन भावात लढत होणार आहे.