सी आर पी एफच्या(सेंट्रल रिजर्व पोलीस फोर्स ट्रेनिंग स्कुल ) कोब्रा स्कुल च्या वतीने यंदाच्या पावसात पाणी बचावाचा उपक्रम सुरू आहे. खानापूर तालुक्यातील तोराळी या गावी पश्चिम घाटात हे काम सुरू आहे.
कोब्रा चे कमांडन्ट प्रीतमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रम राबविला जात आहे. शाळेच्या सर्व इमारती व इतर ठिकाणावरून जमणारे पाणी अडवून जमिनीत जिरविले जात आहे.
या उपक्रमातून दररोज 5 टँकर्स पाणी जमविले जात आहे अशी माहिती सिंग यांनी बेळगाव live ला दिली. दररोज 4000 लिटर पाणी वाचविले जात आहे.
यापूर्वी या शाळेसाठी किणये येथून पाणी न्यावे लागत होते पण आता रोज 5 टँकर पाणी जपले जात आहे.
या उपक्रमातून पाणी टंचाई निवारली जाणार आहे. शाळे बरोबरच आसपास राहणाऱ्या नागरिकांचीही समस्या सुटणार आहे.