बेळगाव शहरातील कसाई गल्ली आणि कॅटोंमेंट भागातील कॅम्प मध्ये सुरू असलेल्या कत्तलखान्या मुळे गटारीत पाणी वाहून जात असल्याने प्रदूषण होत आहे ते कत्तलखाने बंद करावे अशी मागणी उत्तर भाजपने केली आहे.बुधवारी सकाळी किरण जाधव यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले.
कॅम्प आणि कसाई गल्लीतील कत्तल खान्यात जनावरांच्या कत्तलीमुळे गटार व रस्त्यात कत्तल खान्याचे पाणी मिश्रण झाल्याने प्रदूषण होत आहे त्यामुळे रोग राई उदभवण्याचा धोका आहे ते कत्तल खाने बंद करा अशी मागणी केली आहे.
बेळगावातील सर्वच कोल्ड स्टोरेज आणि कत्तल खाण्याचे परवाने रद्द करा यासाठी उत्तर भाजप कडून प्रयत्न केले जात होते गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्ड स्टोरेज मधील दहा टन मांसाची विल्हेवाट लावण्यात आली आहे हे या लढ्याचे यश आहे त्यासाठी प्रदूषण नियंत्रण खात्याचे आभार मानले आहेत.
कसाई गल्ली व कॅम्प बाबत महापालिका आयुक्त व प्रदूषण खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊ त्या बैठकीला या त्यावेळी यावर ठोस उपाययोजना करू असे आश्वासन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गोपाळ कृष्ण यांनी दिले.यावेळी श्रीनिवास बिसनकोप्प,अनुप काटे,गजानन नंदगडकर, संतोष पेडनेकर आदी उपस्थित होते.