Wednesday, December 25, 2024

/

सायकल चाले पंढरीची वाट

 belgaum

वेणूग्राम सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी यावर्षी सायकलवरून पंढरपूर वारीचे आयोजन केले असून क्लबचे नऊ सदस्य शनिवारी सकाळी सायकलवरून पंढरपूरकडे प्रस्थान केले.रात्री साडेआठ वाजता हे सदस्य संगोल्याला पोचणार असून तेथे मुक्काम करणार आहेत.

रविवारी सकाळी उठून ते पुन्हा आपल्या प्रवासाला प्रारंभ करणार असून पंढरपूरला पोचल्यावर दर्शन घेऊन ते बेळगावला परतणार आहेत.आपल्या प्रवासात ते पर्यावरणाचे रक्षण करा,पाणी वाचवा,जंगल वाचवा असा संदेश ते देणार आहेत.

प्रत्येकाने आपल्या सायकलवर हे संदेश देणारे फलक लावले आहेत.अरुण पाटील,सतीश पाटील,रणजित पाटील,रमेश गोवेकर,अभिजित पारिषवाड,सचिन अष्टेकर,विजय कामत,मयुरेश कारेकर आणि सागर मुतगेकर हे पंढरपूरच्या सायकल वारीत सहभागी झाले आहेत.सायकलवारीसाठी या तरुणांनी गेल्या अनेक महिन्यापासून सायकलचा सराव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.