बेळगाव केएसआरटीसी दुसऱ्या बस डेपो बस कंडक्टर म्हणून असणाऱ्या कंडक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याला जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशा मागणीसाठी दलित संघटनांनी मृतदेह समोर ठेवूनच आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
कंडक्टर आनंद हरिजन राहणार केदनूर असे त्या दुर्दैवी कंडक्टर चे नाव आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीत ज्या अधिकाऱ्यांनी आनंदला त्रास दिला त्यांची नावे आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही असा पवित्रा दलित संघटनांनी घेतला असून परिवहन मंडळातून कोणत्या हालचाली करण्यात येतात याकडे लक्ष लागून आहे.
बेळगाव बस डेपोत हा मृतदेह ठेवण्यात आला असून दलित संघटनांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. काही ही परिवहन अधिकाऱ्यांनी आनंदला मानसिक व शारीरिक छळ केल्याचे माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे दलित संघटनांनी जोरदार आंदोलन सुरू केले असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी लावून धरली आहे.
हे आंदोलन सुरू असतानाच बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याचबरोबर पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. दलित संघटना मात्र जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच असणार असा इशारा दिला आहे. अजूनही मृतदेह डेपोत ठेवून आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे.