तालुका पंचायत मध्ये सहाय्यक सचिव म्हणून रुजू असलेले मल्लिकार्जुन कलादगी यांची बढतीवर बेळगाव तालुका पंचायतमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.
तत्कालीन कार्यकारी अधिकारी पद्मजा पाटील यांनी कलादगी यांच्याकडे सूत्रे दिली असून त्यांची इतरत्र बदली झाली आहे. यावेळी ग्राम विकास अधिकारी प्रकाश कुडची मुतुराज बरगी, तालुका पंचायत व्यवस्थापक सी व्ही चव्हाण, प्रीती अवनी, श्रीदेवी हिरेमाठ, बलराज बजंत्री, नाईक यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
या वेळी बेळगाव live शी संपर्क साधताना कलादगी म्हणाले, रखडलेल्या कामांना चालना देणार असून उद्योग कात्रीत होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. कोणत्याही सामान्य नागरिकांच्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विशेष करून उद्योग खात्री तून निसर्ग संवर्धनाचा ध्यास बाळगण्यात येणार आहे.
काही ग्रामविकास अधिकार्यांच्या मनमानी कारभाराचा पाडा आपल्याजवळ वाचण्यात आला आहे. त्याविषयी ही आपण गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करू, असे त्यांनी यावेळी सांगितले