केंद्र आणि राज्य सरकार दोघांत संयुक्तपणे स्मार्ट सिटीची योजना राबवली जात आहे याला अनेक समित्या उप समित्या आहेत अनेकांच्या परवानग्यांची गरज आहे देशात या योजनेची कामे सगळीकडे संथ गतीने सुरू आहेत याचा वेग कमी याला बेळगाव एवढंच अपवाद नाही आगामी काही दिवसात बेळगावचे स्मार्ट सिटी मधील रँकिंग वाढेल असा विश्वास नगरविकास मंत्री यु टी खादर यांनी व्यक्त केला.
स्मार्ट सिटीच्या अनेक कामांची बेळगावात त्यांनी पहाणी केली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेळगाव शहराला स्मार्ट बरोबर सेफ्टी सिटी बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत पोलीस खात्या बरोबर चर्चा करून त्यांना त्यांना रस्त्यावर अत्याधुनिक कॅमेरे आदी सुविधा दिल्या जातील असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी बेळगाव शहराला राज्य सरकार कडून 420 कोटी रुपये देण्यात येणार आहेत आगामी तीन महिन्यात या योजनेच्या कामाला देखील सुरुवात होणार आहे.8 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहराला मनपाला दरवर्षी 125 सरकार देतंय तर 8 लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहराला 150 कोटी देतंय.आता पर्यंत स्मार्ट सिटीचे 568 कोटी टेंडर काढलेत 400 कोटींची काम सुरू आहेत काही कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत सध्या 120 कोटींच्या कामांचा आराखडा तयार आहे त्याचेही लवकरच टेंडर काढले जातील ही काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे देखील त्यांनी नमूद केलं.
पत्रकारांनी मंत्री महोदयांना पकडले कोंडीत
बेळगाव महा पालिका व्याप्तीत बेकायदेशीर बांधकाम वसाहत वाढवलेत मनपा यावर का कारवाई करत नाही?बेस मेंट पार्किंग वर नियंत्रण नाही असे प्रश्न विचारत पत्रकारांनी मंत्री यु टी खादर यांना कोंडीत पकडले त्यावर ते काही काळ निरुत्तर झाले होते मात्र अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा करतो बेकायदेशीर कामावर कारवाई करू असे
असे आश्वासन त्यांनी दिले.