खानापूर तालुक्यातील माचीगड येथील वारकर्याचा पंढरपूर येथे हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. सदर वारकऱ्याचे नाव ह भ प बाळू निंगाप्पा भुतेवाडकर वय वर्षे 68 असे आहे .त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले चार विवाहित मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.
ह भ प बाळू भुतेवाडकर हे एक सेवानिवृत्त शिक्षक असून गेल्या चाळीस वर्षापासून ते वारकरी होते. लहानपणीच वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी पंढरीची वारी घेतली होती त्यानंतर त्यांनी शिक्षक की सेवा करत पांडुरंगाची सेवा ही केली .
गेल्या चाळीस वर्षात त्यांनी आषाढी वारी कधीही चुकवली नव्हती. दोन दिवसापूर्वी ते पंढरपूरला विठू माऊलीच्या दर्शनासाठी व आपली नित्य वारी पूर्ण करण्यासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते रेल्वे स्टेशन जवळील आपल्या गावच्या वारकर्यांकडे आले होते त्या ठिकाणी त्यांना अचानकपणे हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांची प्राणज्योत मावळली.
त्यांचा मृतदेह रात्री माचीगड येथे आणण्यात आला असून आज शनिवारी सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, ते माचीगड येथील तरुण भारत वृत्तपत्र एजंट नारायण भुतेवाडकर यांचे ज्येष्ठ बंधू होत,