बेळगावहून गोव्याला जाणाऱ्यासाठी रेल्वे खात्याने खुश खबर दिली असून आगामी 20 जुलै पासून बेळगाव-वास्को-बेळगाव स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार आहे
रेल्वे खात्याने बेळगाव-वास्को-बेळगाव 06921/06922 या स्पेशल साप्ताहिक ट्रेनला ट्रायल बेस वर तीन महिन्यांसाठी 20 जुलै पासून परवानगी दिली.
सदर रेल्वे शुक्रवार आणि शनिवारी बेळगाव वास्को दरम्यान धावणार आहे. उदघाटन स्पेशल ट्रेन नंबर 06922 वास्को बेळगाव या गाडीच 20 जुलै रोजी उदघाटन वास्को रेल्वे स्थानकावर होणार आहे.
रेल्वे क्रमांक संख्या 06921/06922 बेळगाव वास्को बेळगाव ही साप्ताहिक ट्रेन 26 जुलै पासून 26 ऑक्टोबर पर्यंत चालणार असून 10 डब्यांची असणार आहे.
बेळगाव हुन सुटणार सकाळी 6:20
वास्कोला पोचणार-12:40
वास्कोहून बेळगावकडे निघणार 15:55
बेळगावला पोहोचणार:21:25