वडगावची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगाई देवीची यात्रा मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली.मध्ये मध्ये पडणारा झिरमुठ पाऊस,थंडी आणि थोडं उघडीप असली तरी नेहमी पावसात देखील लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
मध्यरात्रीपासूनच भाविकांनी देवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.मंदिराच्या हक्कदार आणि वतनदारातर्फे सकाळी देवीचे धार्मिक विधी पार पडले.एक महिन्यांपूर्वी देवीला घालण्यात आलेले गाऱ्हाणे यात्रेच्या दिवशी उतरविण्यात आले.
यात्रेच्या निमित्ताने अनेक भक्तांनी आपले नवस फेडले.कोंबडीची लहान पिल्ले मंदिरावर उडवून अनेकांनी नवस फेडला. मंदिर परिसरात पूजा साहित्य आणि खेळण्याची दुकाने थाटण्यात आली होती.भक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता.
केवळ बेळगावं शहरचं नव्हे तर महाराष्ट्र गोव्याहून देखील भाविक बेळगावात दाखल झाले होते लाखों भाविकांनी देवीचे दर्शन घेतलं.वडगांव पाटील गल्ली,विष्णू गल्ली कारभार गल्ली येळ्ळूर रोड सोनार गल्ली भागात गर्दी झाली होती.वडगांवला जाणाऱ्यांची गर्दी ओळखून पोलीस प्रशासनाने देखील बंदोबस्त ठेवला होता.
पाऊस येणार हे ओळखून मंदिरा समोर चिपिंग टाकण्यात आली होती महिलांना आणि पुरुषांसाठी दर्शन लाईन करण्यात आली होती मंदिर परिसरात विविध साहित्य विक्रीसाठी स्टॉल मांडण्यात आले आहेत बालचमुसाठी खेळणी,विविध प्रकारचे पाळणे लक्ष वेधून घेत आहेत.मंगळवारी पासून सुरू झालेली ही यात्रा रविवार पर्यंत चालणार आहे.