बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पावर व्यवस्थापकीय संचालक ( एम डी) पदावर झालेली नवी नेमणूक वादात अडकली आहे. कर्नाटक नगर प्रशासन सेवा दर्जाच्या अधिकाऱ्याला हे पद देण्यात आल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
शिरीन नदाफ यांची या पदावर नियुक्ती झाली आहे. या पदावर फक्त आय ए एस दर्जाचे अधिकारीच नेमले जातील असे जाहीर करण्यात आले होते. मुलीहन आणि झिया उल्लाह यांनी या पदावर यापूर्वी या पदावर काम केले. तर शशीधर कुरेर या के ए एस दर्जाच्या अधिकार्यानेही या पदावर काम केले आहे.
कर्नाटक नगर प्रशासन सेवा अधिकारी यापूर्वी नगर पालिका आणि नगर पंचायतीत नेमले जात होते पण यावेळी याच दर्जाचे अधिकारी या महत्वाच्या पदावर कसे काय नेमले हा प्रश्न आहे.
बेळगाव शहराच्या मनपा आयुक्तांना हे पद देता येऊ शकते अशी परवानगी कर्नाटक सरकारने यापूर्वी दिली होती. पण हा नवा नियम कधी काढला हा शोध सुरू आहे.