आज मंगळवार दि 30 जुलै रोजी पहाटे पाच वाजता राकसकोप धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यावर्षीची बेळगावच्या नागरिकांची पाण्याची भ्रांत वरूण राजाने मिटवली आहे. वाढीव पाणी बाहेर सोडण्यासाठी धरणाचे एक आणि पाच क्रमांकाची द्वारे खुली करण्यात आली आहेत.
हे धरण दरवर्षी भरून वाहण्याची प्रार्थना करावी लागते कारण याच धरणावर बेळगाव शहराला पाणी मिळते. 2018 मध्ये 16 जुलै, 2017 मध्ये 10 सप्टेंबर, 2016 मध्ये 7 ऑगस्ट, 2015 मध्ये 4 ऑगस्ट, 2014 मध्ये 30 जुलै, 2013 मध्ये 22 जुलै आणि 2012 मध्ये 6 ऑगस्ट ला, 2011 मध्ये 18 जुलै आणि 2010 मध्ये 4 ऑगस्टला हे धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाले होते.राकसकोप भरण्यासाठी काल दीड फूट पाणी गरजेचे होते.
बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पाणी पातळी वाढली असून जलाशय ओव्हरफ्लो होण्यासाठी केवळ दीड फूट बाकी आहे. अशी माहिती काल मिळाली होती.
गेल्या तीन दिवसांपासून तिलारी राकसकोप धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे पाणी पातळी वाढली. आणि आज डॅम ओव्हर फ्लो झाले आहे.
जलाशय पूर्ण भरण्यासाठी 2478 फूट पाणी लागते. सोमवारी दुपारी बारा वाजता धरणात 2476.10 फूट पाणी जमा झाले आहे. तासा तासांनी हा आकडा वाढत गेला. पाऊस सातत्याने पडल्याने मंगळवारी पहाटे पाच वाजता डॅम ओव्हरफ्लो झाले आहे.
पाणी पुरवठा खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राकसकोप जलाशयात सध्या पूर्णपणे पाणी भरले आहे . गेल्या दीड महिन्यात या भागात 1203 मीमी पाऊस झाला आहे.या भागात पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्याने मंगळवारी धरण भरण्यास मदत झाली आहे.
रविवार दि 7 रोजी जलाशय परिसरात 16.6 मीमी पाऊस झाला होता त्यामुळे सोमवार दि 8 रोजी पाणी पातळी 2458.30 फूट इतकी होती.त्याचदिवशी सायंकाळी 2459.50 ची नोंद झाली होती.
जून महिन्याच्या अखेरीस 2444.35 फूट इतकी नोंद होती. सध्या पाऊस जोर सुरू असल्याने बेळगावचा पाणीप्रश्न सुटला आहे.