बेळगाव पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात कारवाईचे सत्र चालूच ठेवले असून गांजा विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे.
सी इ एन आणि सी सी बी पोलिसांनी धाड टाकत पाच मोबाईल फोन एक किलो 500 ग्राम 32950 रुपयांच्या किंमतीचा गांजा जप्त केला आहे. सी इ एन पोलीस स्थानकाचे निरीक्षक यु एच सातनहळळी यांच्या नेतृत्वाखाली ही धाड टाकण्यात आली आहे.
गॅंगवाडी जवळील धर्मनाथ भवन जवळ पाच जण प्लास्टिक बॅग मधून गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून रंगेहाथ पकडले आहे. मोदीन अत्तार वय 34 रा. सुभाषनगर, तबरेज अंडेवाले वय 20 रा.वीरभद्र नगर,चेतन शिंदे वय 19 रा.अनगोळ,मोहममद यासिन अत्तार वय 23 सुभाषनगर,मोहम्मद शाहिद मुल्ला वय 19 वीरभद्रनगर आदींना अटक केली आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी मोठी कारवाई करत आठ जणांना अटक केली त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पाच गांजा विक्री करणाऱ्याना अटक केली आहे.