मैसूर हुबळी ही दैनिक रेल्वे मिरज पर्यंत विस्तारित करण्याचा हालचाली सुरू झाल्यामुळे बेळगाव शहर रेल्वेमार्गे मैसूरला थेट जोडले जाणार होते आता याबाबत आणखी एक आनंदाची बातमी आली असून रस्ता रेल्वे सोबत मैसूर बेळगाव हे विमान मार्गे देखील जोडले जाणार आहे.मैसूर चे खासदार प्रताप सिंह यांनी एक ट्विट केले असून 27 ऑक्टोबर पासून मैसूर ते बेळगाव मार्गावर विमान सुरू होणार अशी माहिती त्यात लिहिली आहे.
हा मार्ग टर्बो मेगा या कंपनीने हा मार्ग मिळवला असून ऑक्टोबर पासून विमान सुरू झाले आहे असे कळविले आहे.बेळगाव मैसूर हा मार्ग देखील उडान तीन मध्ये मंजूर झाला आहे.एअर इंडिया अलायन्स एअर वेज, स्पाईस जेट,स्टार एअर नंतर आता बेळगावहुन इंडिगो आणि टर्बो मेगा चे विमान झेप घेणार आहे.
पाहुयात उडान योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात मंजूर झालेले मार्ग आणि विमान कंपन्या
बेळगाव ते सुरत(घोडावत)
बेळगाव ते आग्रा(इंटरग्लोब)
बेळगाव ते तन्जोर(स्पाईस जेट)
बेळगाव ते जयपूर(घोडावत)
बेळगाव ते जोधपूर(घोडावत)
बेळगाव ते तिरुपती(घोडावत, टरबो मेघा)
बेळगाव ते अहमदाबाद(घोडावत)
बेळगाव ते पुणे(अलायन्स एअर)
बेळगाव ते नाशिक(घोडावत)
बेळगाव ते नागपूर(घोडावत)
बेळगाव ते हैद्राबाद(इंटर ग्लोब,स्पाईस जेट,टरबो मेघा)
बेळगाव ते काडाप्पा(टरबो मेघा)
बेळगाव ते मैसूर(टरबो मेघा)
बेळगाव ते इंदूर(घोडावत)
बेळगाव ते गुलबर्गा(घोडावत, अलायन्स एअर)